Marathi Quotes on Book प्रत्येक मुलासाठी निराळे पुस्तक
Pustak Quotes in Marathi
शिशुसंगोपनशास्त्रावरची पुस्तके वाचून मुलांचे संगोपन करण्याची कल्पना चांगली आहे; पण त्यात अडचण एकच आहे कि प्रत्येक मुलासाठी निराळे पुस्तक लागेल.
एक मन विद्येबरोबर दहा मन अक्कल लागते.
जुना कोट घाला, पण नवे पुस्तक विकत घ्या.
असभ्य राष्ट्रे सोडली तर साऱ्या जगावर पुस्तकांचेच राज्य आहे.
पुस्तकांची किमंत रत्नापेक्षाही जास्त आहे. रत्ने बाहेरून चमक दाखवतात, तर पुस्तके आतून अंतःकरण उज्वल करीत असतात.
विचारांच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.