Marriage Quotes in Marathi लग्नाच्या पुस्तकातले
Marathi Quotes on Lagna
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी सर्व घटस्फोटांचे एकमेव कारण म्हणजे लग्न, विवाह किंवा म्यारेज.
लग्नाच्या पुस्तकातले पाहिले प्रकरण काव्यात लिहिलेले असते आणि पुढची सारी प्रकरणे रुक्ष गद्यातच असतात.
आपल्या अंगात इतके दुर्गुण असू शकतील याची माणसाला लग्न होईपर्यन्त कल्पनासुद्धा नसते.
विवाहसंस्था ही एखाद्या होटेलसारखी असते. आपण काहीतरी घेतो आणि मग दुसऱ्याने काय घेतले ते पाहिले म्हणजे मग आपण सुद्धा तेच घेतले असते तर बरे झाले असते, असे आपणाला वाटू लागते.